{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}
दिवा (ठाणे)- काल दिवसभरात ‘विकास म्हात्रे गेट’ येथे एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने तब्बल ५ पेक्षा अधिक जणांना चावा घेतला असल्याची घटना समोर आली असून विभागात सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दिवा शहरातील विविध ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा हैदोस पहायला मिळत आहे. पालिका प्रशासना कडून याबाबत अद्याप कोणताही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही.
- नुकत्याच घडलेल्या अश्याच एका घटनेमुळे दिव्यातील साईबाबा मंदिर (बेडेकर नगर) येथील एका ५ वर्षीय बालिकेला रेबीज ची लागण झाल्याने तीला आपला जीव गमवावा लागला असल्याची घटना समोर असताना मात्र पालिकेकडून नागरिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.
या घटनेमुळे ठाणे महापालिकेकडून रबण्यात आलेली ” रेबीज मोहीम ” सपशेल अपयशी ठरली असल्याचे नागरिकांकडून बोलले जात असून, आता तरी पालिका प्रशासन याबाबत काही ठोस उपाय योजना करणार का?असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
