दैनिक चालू वार्ता रिसोड शहर प्रतिनिधी -विजय जुंजारे.
रिसोड शहरातील समर्थ नगर परिसरात असलेल्या महेंद्र वसंतराव बिडवे यांच्या हॉटेलवर मजुरीचे काम करणाऱ्या एका मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतकाचे नाव राजेश कुमार मोमन पंडित शर्मा (वय 45 वर्षे) असून तो पानिपत, तालुका कलायत, जिल्हा कैथल, राज्य हरियाणा येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर नागरे हे आपल्या सकाळी 08 ते दुपारी 14 या डी.ओ. ड्युटी दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळ पंचनामा तसेच मृतकाचा इनक्वेस्ट पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, रिसोड येथे पाठविण्यात आला.
उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह मृतकाच्या गावातील त्याचा मित्र बिट्टू राम हुशार सिंग यांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच त्यांच्या जबाबावरून पोलीस स्टेशन रिसोड येथे मर्गची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मृतकाच्या मृत्यूबाबतची माहिती त्याचे मेहुणे जोगिंदर शर्मा (मोबाईल क्रमांक: 99302 72977) यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली असून, मृत्यूबाबत कोणतीही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन रिसोड येथे हजर राहण्याबाबत त्यांना समज देण्यात आली आहे.
या घटनेमुळे समर्थ नगर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
