इगतपुरी प्रतिनिधी:-विकास पुणेकर
इगतपुरी :- कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय इगतपुरी येथे २६ जानेवारी २०२६ रोजी ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन राष्ट्रध्वजाचे पूजन व ध्वजारोहण, राष्ट्रगीत, ध्वजगीत, परेड निरीक्षण,एन.सी.सी.संचलन, एन.सी.सी.गीत, वृक्षरोपन, विविध सांस्कृतिक उपक्रमाने अत्यंत उत्साहात आणि देशप्रेमाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी मविप्र संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक अॅड.संदिप गुळवे व प्राचार्य डाॅ.किरण रकिबे यांच्या हस्ते ध्वजारोहण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना अॅड.संदिप गुळवे म्हणाले की, “भारतीय लोकशाहीने जगाला ‘अनेकतेमध्ये एकता’ ही राष्ट्रीय प्रेमाची मोठी देणगी दिली आहे. आज २०२६ मध्ये वावरताना लोकशाहीची व्याख्या केवळ मतदानापुरती मर्यादित राहिलेली नाही. डिजिटल आणि सोशल मीडियाच्या युगात अफवांपासून दूर राहून सत्याची बाजू धरणे, हीच खरी संविधानिक नैतिकता आहे.”
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण रकिबे यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “आता आपले लक्ष्य २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे आहे. गोवर्धने महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे संशोधन आणि कौशल्य (Skill) देशाच्या जीडीपीमध्ये भर टाकणारे असावे. राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांनी आपले ज्ञान व कौशल्य अद्ययावत ठेवणे काळाची गरज आहे.” कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण एन.सी.सी. विभागाचे संचलन ठरले. कॅप्टन डाॅ.एस.एस.परदेशी व सिनियर अंडर ऑफिसर यश इचम यांच्या नेतृत्वाखाली ५० छात्रसैनिकांनी शिस्तबद्ध परेड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी इंडियन आर्मीचे भोसले राजाराम व इंडियन नेव्हीचे प्रेम माने, भोसले उत्तम या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यानंतर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.कल्पना वाजे यांच्या मार्गदर्शनातून विविध सांस्कृतिक गीते आणि महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवण्यात आले. या सोहळ्याला महाविद्यालय व स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व विविध क्षेत्रातील मान्यवर म्हणून संपतराव मुसळे, श्रीमती वैशालीताई आडके, उत्तम गोवर्धने, गिरीश मेधने, शरद हांडे व आर.के.अहिरे, एस.टी.मोटकरी वनपाल सामाजिक वनीकरण विभाग, डॉ.विष्णू राठोड, प्रा.कन्हैया चौरेसिया आणि राकेश गायकवाड आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम सांगळे, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा संचालक प्रा.हरिश वसावे, प्रा.अजय निकम, प्रा.अरूण वाघ, प्रा.एस.टी.शिंदे, महेश उगले, चंद्रकांत खातळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
