शिक्रापूर प्रतिनिधी प्रफुल्ल गायकवाड
पाबळ (ता शिरूर) व परिसरातील खैरेनगर, धामारी, कानूर मेसाई, केंदूर, या गावांमध्ये अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे
वादळी वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की अनेक ठिकाणी सिमेंट पत्र्यांची शेड उडून गेली काही शेतकऱ्यांच्या घरांवरील छप्परही उडाले असून तब्बल ५० हून अधिक पत्रे वाऱ्याने उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत यामुळे घरांचे तसेच शेतीतील संरचनांचे मोठे नुकसान झाले आहे
तसेच, गारपिटीमुळे गहू, ज्वारी, कांदा, बाजरी तसेच जनावरांच्या खाद्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे उभी पिके अक्षरश जमीनदोस्त झाल्याने शेतकरी वर्गावर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे विशेषत पाबळ, धामारी, खैरेनगर व कानूर मेसाई भागात गारपिटीचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून येत आहे
या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य प्रफुल शिवले तसेच पंचायत समिती सदस्य वंदनाताई पवार यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून प्रशासनाला पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करून मदत जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जातआहे
