दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम:-श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला.श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिम्मित वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रविण दादा रणबागुल यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालय भूम येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस १० मे रोजी स्वाभिमान दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद लगाडे ,युवक जिल्हाउपाध्यक्ष वैभव गायकवाड, आक्की गायकवाड ,रोहित गायकवाड, सचिन शिंदे, किरण शिंदे, पांडू गायकवाड ,रुपेश शिंदे ,ऋतुराज शिंदे, छकुल सरवदे, दिपक इजगज,अजय थोरात गुड्डू गायकवाड ,धिरज शिंदे,दत्ता शिंदे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
