दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-श्री,रमेश राठोड आर्णी
“”””””””””””'”””'”””””””””””””””””””””””””””””'””””””’
आर्णि तालुक्यातील असलेल्या उमरी कोपेश्वर येथील 25 फेब्रुवारी 2022 रोजी विजेच्या जिवंत पडून असलेल्या तारेचा करंट प्रमोद नेवारे यांना लागला होता त्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रमोद नेवारे यांचा एक हात निष्कामी होऊन त्यांचे पोट पूर्णपणे भाजले गेले होते ही घटना घडल्या नंतर ही विद्युत वितरण कंपनी मार्फत कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत केली नाही
शेवटी जिल्हा रुग्णालयात प्रमोद नेवारे यांचा दि , 9 मे रोजी दुःखद निधन झालं ।
ही वार्ता महावितरण ला कळविण्यात आली तरीही काही आर्थिक मदत केली नाही ह्या अशा नाजूक परिस्थिती मध्ये मा, आमदार मदन भाऊ येरावार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा, श्याम भाऊ जयस्वाल यांच्या मार्फत दि , 10 मे रोजी स्वतः जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन नंतर जिल्हा महावितरण कार्यालयात यवतमाळ येथे जाऊन मृतकाच्या परिवारास 4 लाख रुपयांची(धनादेश )त्वरित आर्थिक मदत मिळून दिली ह्यावेळी श्याम भाऊ जयस्वाल , सचिन चचाने , विजय नेवारे ,विकास चौधरी , राजेश नागोसे,थावरू चव्हाण , रवी वारंजे , हरीश शेंद्रे , दादाराव बोटरे , निलेश गजबे , श्रीधर काळसरपे , राम शेंद्रे , दिनेश नागोसे , आदी उपस्थित होते
