दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- शेतकर्यांना जमिनीचे टायटल कार्ड देऊन उपग्रहाद्वारे जमीन मोजनी करून द्यावी असे जाधव व्यंकटी गोविंदराव उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बाॅईज असोसिएशन रा. सिरसी बु. पो. पेठवडज ता. कंधार जी. नांदेड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निवेदन देऊन उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय कंधार यांना प्रतिलिपी निवेदन सादर करण्यात आले आहे. तेव्हा शासनाने योग्य ति कार्यवाही करुन शेतकर्यांना जमिनीचे उपग्रहाद्वारे मोजमाप करून देण्यात यावे असे जाधव यांनी प्रशासनाला कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यांनी भुमीलेख कार्यालय कंधार यांना आदेशानुसार शेतकर्यांना जमिनीचे उपग्रहाद्वारे मोजमाप करून देण्यात यावे यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हाधिकारी साहेबांनी कळविले आहे.
