दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी-गुणाजी मोरे
प्रचंड मोठ्या प्रमाणावर महागाई वाढली आहे. तेंव्हा, या महागाईस जबाबदार असलेल्या मोदी सरकार विरुद्ध आवाज उठविण्यासाठी शिवसेनेच्या वतीने राज्यभर आंदोलने करण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचे माजी आमदार श्री. महादेवजी बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन कोंढवा खुर्द येथील आशीर्वाद बिल्डिंग मिठानगर चौकात करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित आंदोलकांनी मोदी सरकाच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाजीपाला व किराणा साहित्य या सर्व गोष्टींचे भाव गगणाला भिडले आहेत. सामान्य माणूस महागाईच्या झळांनी त्रस्त झाला आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले होते. यावेळी प्रभाग क्रमांक २७ मधील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….!!
