दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील खोडाळा गावचे सुपुत्र सचिन गंगाराम पाटील याने आपला विवाह आदिवासी पद्धतीने करत समाजापुढे आदर्श ठेवला प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करत निसर्गदेवतेचे तसेच हिरवा देवाचे पूजन नवरी सचिन व नवरी अश्विनी यांच्या हस्ते करण्यात आले तदनंतर आदिवासी देवदेवता, निसर्गदेवतेचे मंगलाष्टाकातून गौरव करत आदिम लगीन सोहळा पार पडला, लगन्या म्हणून पुरोगामी विचारवंत राजेंद्र जागले सर यांनी आदिवासी प्रथा, पूजन यांचे महत्त्व पटवून दिले सदर कार्यक्रमास बामसेफचे कार्यकर्ते गजानन दुबळा सर, वायदा सर डहाणू हे उपस्थित होते.तसेच सामाजिक कार्यकर्ते सदानंद हमरे, गोरख झोले इंजिनियर भावेश पाटील, जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते रुपेश हमरे,सुनिल पाटील यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव भाकरे,जनार्दन पाटील,खंडू खतेले,मारुती शिंदे,किशोर शिंदे,प्रकाश कौले,शैलेश गडगे,प्रविण भालिंगे,प्रितम पाडेकर,नितीन आंबेकर, संतोष पिचड, रघुनाथ लक्ष्मण हमरे व नातेवाईक,सगे सोयरे, मित्र मंडळी, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर मोठया प्रमाणात हजर होते, सदर लगीन सोहळ्याचे सूत्रसंचालन आद्यक्रांतिवीर राघोजी भांगरे राघोजी भांगरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच ठाणे /पालघरचे अध्यक्ष प्रा. संजय इधे यांनी करत महामानवांचे कार्य थोडक्यात विषद केले.
ह्या लगीन सोहळ्याची चर्चा परिसरात होत असून रमेश भालिंगे परिवार नांदगाव व सचिन पाटील यांना अभिनंदनाचे फोन आदिवासी क्षेत्रातून महाराष्ट्र भरातून येत आहेत
