दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस टोलनाका येथे हातभट्टीची दारू वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली.
या व्यक्तीकडून वाहनासह सुमारे ४ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी पोलीस हवालदार निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड ,अक्षय यादव ,रामदास जगताप, प्रवीण चौधर यांचे पथक यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड यांना माहिती मिळाली की, सोलापूर बाजूकडून पुण्याकडे जाणारी मारुती स्विफ्ट (एम .एच.१२ ए.टी. ७८९४ ) मधून एक इसम गावठी हातभट्टीची तयार दारू वाहतूक करीत असल्याबाबत माहिती मिळाली होती.
पोलीस दूरक्षेत्र येथील सहाय्यक फौजदार सारंग चव्हाण, संजय देवकाते ,निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप, प्रवीण चौधर यांनी पाटस टोल नाका येथे आरोपींना पकडले. पोलीस पथकाने बॅरीकेट लावून वाहन चालक अमित धुल्ला गुडदावत ( वय २४ वर्षे) (रा.शेलारवाडी, गाडामोडी, ता. दौंड जि. पुणे) यास ताब्यात घेऊन गाडीची पाहणी केली असता सदर वाहनांमध्ये ७ गावठी हातभट्टीची तयार दारूची कॅन मिळून आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, नारायण पवार, सागर चव्हाण, संजय देवकते, निलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव ,रामदास जगताप, प्रवीण चौधर यांनी ही कामगिरी केली.
