दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
अहमदाबाद : आगामी काळात गुजरातमध्ये निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाकडून गुजरातमध्ये प्रचार सभा घेतल्या जात आहेत. दरम्यान, गुजरातमधील सभेत बोलताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
भाजकाकडे ईडी आणि सीबीआय असून श्रीकृष्णाचा आशीर्वाद असल्याचा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
“भाजपाजवळ पोलीस, आर्मी, एअर फोर्स, ईडी, सीबीआय आहे. मात्र, आमच्याकडे श्रीकृष्ण आहे. आमच्याकडे त्यांचा आशीर्वाद आहे. आप पक्ष केवळ ८ वर्ष जूना पक्ष आहे. मात्र, देशभरात आम्ही आमची छाप सोडत आहोत. दोन राज्यात आमची सरकार आहे. आता गुजरातमध्येही आमची सरकार बनेल” , अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
दिल्लीत आम्ही १२ लाख मुलांना मोफत शिक्षण दिले आहे. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. दिल्लीत आम्ही सर्वांना मोफत वैद्यकीय सुविधा देत आहोत. ज्या गरीब लोकांना मोफत सुविधा मिळत आहेत, त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला देशभरात समर्थन मिळत आहे”, असेही ते म्हणाले. जर तुम्हाला मोफत शिक्षण आणि वैद्यकी सुविधा पाहिजे असेल, तर आप पक्षाला मत द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
