दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा : – तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत आज डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षणदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळेत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांच्या जिवन चरिञ्यावर भाषण करण्यात.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिनाचे औचित्य साधुन स्वयंशासनदिन पण साजरा करण्यात आला यावेळी एक दिवसीय शाळेचे नियोजन अतिशय सुंदर प्रकारे शाळेतील प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी केले. यामध्ये शाळेत मुख्याध्यापक आज दिनांक पाच सप्टेंबर 2022 रोजी जि प प्रा शा पांगरी येथे शिक्षक दिन व स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रावर आधारित भाषणे केली. तसेच शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक म्हणून भगवती त्र्यंबक बुद्रुक हिने काम पाहिले. उप मुख्याध्यापक म्हणून पल्लवी राजीव हंकारे यांनी काम पाहिले. तसेच शिक्षक म्हणून श्रीकांत भरत पवार, अर्जुन ईरबा बुद्रुक, शिवम गुंडाळे, दुर्गा पावडे, प्रभावती वावरे व सेवक म्हणून शिवराज मेने यांनी काम पाहिले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री बटलवाड एम .डी. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ह्या कामी सहशिक्षक श्री गोंड इ. बी. यांनी सहकार्य केले.
