दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
:-शहरातील राजा भगीरथ विद्यालयातआज दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तसेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्तआम्ही चालवू आमची शाळा या उपक्रमा अंतर्गत इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यां-विद्यार्थ्यांनी आज एक दिवशीय सर्व कर्मचारीअधिकारी व शिक्षकांची भूमिका बजावत शाळेत एकदिवसीय विषय निहाय अध्यापन करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक के.आर.दिक्कतवार सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जैन,पत्रकार राम चिंतलवाड यांची आवर्जून उपस्थिती होती.यावेळी प्रमुख पाहुण्यांनी डॉ.राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्याध्यापक प्रथमेश अंभोरे,उप मुख्याध्यापक संकेत घुले,पर्यवेक्षक प्रतीक राठोड तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कुमारी मधुरा जाधव,उपप्राचार्य म्हणून कुमारी सोनल जैन तर विज्ञान शिक्षक म्हणून कुमारी भावंडे यांनी एकदिवसीय वर्गावर अध्ययन केले होते.नियोजन शाळेतील शिक्षक,शिक्षकेतर,कर्मचारी तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक मंडळी यांनी केले होते. कार्यक्रमात परिश्रम सुधीर उत्तरवार सर,दिलिप कोंडामंगल,सुरेश जाधव, व्हि.पी.आलेवाड,बाचावार वाय.एस.,कगेवाड,प्रा.एस.टी.सगर, प्रा.सोमवंशी,प्रा.सूर्यवंशी प्रा.मिरजगावे,प्रा.कानगुले यांची उपस्थिती होती.अनेक विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी स्वयंशासन निमित्त अध्यापन करण्यामध्ये उस्फूर्त सहभाग नोंदविला होता.यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिकचे विद्यार्थी मिळून जवळपास ३०विद्यार्थी सहभागी होते. चार सेवक, एक क्रीडाशिक्षक म्हणून कर्मचाऱ्यांचे काम पाहिलेआहे.यामध्ये माध्यमिकचे अनुक्रमे तीन क्रमांक शाळेने काढण्यात आले.त्यामध्ये कुमारी श्रुती ढगे,संकेत घुले,प्रतिक राठोड दहावीअवर्ग ते बारावी विज्ञान,व कलाचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष के.आर.दिक्कतवार यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि.पी.आलेवार तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुरेश जाधव यांनी केले. यावेळी सौ.तामशेट्टीवार,तगडपल्लेवार मॅडम यांच्यासह कनिष्ठ विद्यालयाचे प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर,कर्मचारीसह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.शिक्षक व स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
