दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा
पुणे : शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा करण्यात येत असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
खरी शिवसेना कुणाकडे याकडे खरे शिवसैनिक वाट पाहत असले, तरी उद्धव ठाकरे कुणाकडे हे महत्वाचे आहे. खरे शिवसैनिक उद्धव यांच्या मागे थांबतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते बाळासाहेबांची परंपरा चालवत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, आज झालेल्या अवघ्या 10 मिनिटांच्या सुनावणीमध्ये पुन्हा एकदा तारीख देण्यात आली असून आता सुनावणी 20 दिवसांनी पुढे ढकलली आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले. महाराष्ट्रतील सत्तासंघर्षावर कोर्टाने आणखी 2 महिने वेळ घेतला, तर तो वेळकाढूपणा ठरेल, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
