दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
चंद्रपूर
चंद्रपूर नगरीत काल शुक्रवारला नेत्रदीपक व लक्षवेधक ठरलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी गांधी चौक येथील यंग चांदा ब्रिगेडच्या स्वागत मंचावरून गणेश भक्तांसह गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
या वेळी मंचावर कल्याणी जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, अजय जयसवाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेन, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, अधिवक्ता राम मेंढे, अधिवक्ता परमहंस यादव, चंद्रशेखर देशमुख, आशा देशमुख, सायली येरणे, सविता दंडारे, सुजाता बल्ली, आशु फुलझेले, निलिमा वनकर, आदींची उपस्थिती होती.
10 दिवसांच्या मुक्कामा नंतर काल गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दुपारी निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दरवर्षी प्रमाणे यंदा ही नागरिक व गणेश मंडळांच्या स्वागतासाठी गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता. गणेश मंडळ स्वागत मंचा जवळ पोहचताच आमदार जोरगेवार यांनी गणेश मंडळांचे स्वागत केले. राज्यावर कोसळलेले नैसर्गिक विघ्न दूर करून राज्याला संपन्नतेचे आणि भरभराटीचे दिवस येवोत अशी कामना बाप्पाला अखेरचा निरोप देतांना आमदार जोरगेवार यांनी या वेळी केली.
