दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
बेटसांगवी येथील दीनदयालय माध्यमिक विद्यालय शाळा बेट सांगवी ,या शाळेतील कुमारी राधा वानखेडे वर्ग सातवा जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन ग्रामीण भागातील मुलगी असून दुसरा क्रमांक पटकावला कुसुम वस्तीगृहात आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाचवी ते आठवी वर्गांमधून दुसरा ,क्रमांक पटकावला महापुरुषाला घडवणारी आई या विषयावर भाषण केले स्वर्गवासी सुलोचनाबाई गुरुनाथरराव कोरडे जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा दिनांक 8 सप्टेंबरला घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये 93 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता मात्र दिन दयालय माध्यमिक विद्यालय बेटसांगवी येथील कुमारी राधा वानखेडे, या विद्यार्थी तिची तयारी शाळेच्या शिक्षिका सौ. देशपांडे मॅडम सौ. जाधव मॅडम यांनी करून घेतली ही ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील विद्यार्थ्याला स्पर्धकांना मागे टाकून द्वितीय येण्याचा मान पटकावला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष व्हि. जी. कदम, सचिव डी. बी. देशपांडे ,देशपांडे उपाध्यक्ष एम .जी .देशपांडे, संचालक बी .ही .कदम शाळेतील सर्व शिक्षक इतर कर्मचारी परिसरातील यांनी कौतुक पद्धत अभिनंदन केले पुन्हा एकदा वर्ग शिक्षकांनी सुद्धा सत्काराचा कार्यक्रम ठेवला व राधा वानखेडे विद्यार्थिनीचा व त्यांच्या पालकाचा सत्कार केला आणि अकराशे रुपये मानधन सुद्धा दिले राधा वानखेडे यांच्या शाळेमध्ये व गाव मध्ये कौतुक केले जात आहे.
