दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील आष्टा येथे जय भवानी गणेश तरुण मंडळ यांच्या वतीने( वर्ष २९ वे) सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील महिलांनी पारंपरिक पणा किंवा चूल व मुल या गोष्टी सोडून सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी व्हावं या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या बक्षीस वितरण समारंभ दरम्यान महिलांसाठी संगीत खुर्ची, मिनी होम मिनिस्टर, गौरी गणपती सजावट हे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात विजेत्या ठरलेल्या महिलांना जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ संयोगिताताई गाढवे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रथम बक्षीस माधुरी मधुकर जगताप,द्वितीय बक्षीस दीप्ती मनोहर पाटील,तृतीय बक्षीस स्वरुपा नंदकुमार जाधव या विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सौ.संयोगिताताई गाढवे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मा.नगरसेविका मेहेराजबेगम सय्यद यांच्यासह या कार्यक्रमासाठी मंडळाचे अध्यक्ष सुसेन अण्णा जाधव व सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच गावातील महिला,ग्रामस्थ उपस्थित होते.
