दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
15 राज्यातील प्रतिनिधींनी घेतला भाग
जातनिहाय जनगणना ,नॉन क्रिमीलियर, 55 वर्षा वरील शेतकरी व मजुरांना पेन्शन यावर जन आंदोलनाचा निर्धार
शिष्टमंडळाने शरदचंद्र पवार यांचीघेतली भेट
देगलूर:- राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाची सभा 9 सप्टेंबर 2022 ला महाराष्ट्र सदन दिल्ली येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 15 राज्यातील प्रतिनिधींनी भाग घेतला. ओबीसी आणि बहुजन समाज च्या प्रमुख प्रश्नावर संपूर्ण भारत देशात जातनिहाय जनगणना होणे काळाची गरज आहे याकरिता सर्व प्रतिनिधींनी जोर दिला व ओबीसी समाजाच्या मागण्या भारत सरकार जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत जन आंदोलन करण्याचा सुद्धा सर्व प्रतिनिधींनी या बैठकीत सहमती दर्शविली .त्याच बरोबर ओबीसी समाजाची नानक्रीमियर अट रद्द करण्यात यावे ,भारत कृषीप्रधान देश असल्यामुळे 80 टक्के अर्थव्यवस्था ही कृषी आणि कृषी संबंधित कार्यावर निर्भर आहे .परंतु भारत देशात शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव दिल्या जात नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या कमजोर आपला जीवन व्यतीत करीत आहे .भारतीय शेतकऱ्याला राष्ट्रीय उत्पादक चा दर्जा दिला पाहिजे .खऱ्या अर्थाने शेतकरी व शेतीत काम करणारा मजूर यांना 55 वर्ष झाल्यानंतर पेन्शन योजना शासन स्तरावर लागू झाली पाहिजे या विषयावर सुद्धा कार्य समितीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर एक प्रतिनिधी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे यांच्या नेतृत्वात भारताचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मागण्या संबंधात निवेदन सादर करण्यात आले .यावेळी शरद पवार यांनी वरील समस्यांना संमती दर्शवून ओबीसी ,एससी, एसटी, सर्व संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही असं मार्गदर्शन केले. या बैठकीत गणेश भाऊ पारधी राष्ट्रीय युवक महासचिव राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ, भूमेश्वर कटरे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव ,अजयजी चौधरी उत्तर प्रदेश ,अरविंद खटाना हरियाणा, खेमचंद कोली दिल्ली ,राजकुमार बैसूया दिल्ली ,हिरालाल प्रजापती उत्तर प्रदेश, संतोष त्रिपाठी उत्तर प्रदेश ,एन. पी .सिंग हरियाणा ,कृष्णा नामाजी राजस्थान ,विशाल जोगदंड उत्तर प्रदेश ,डॉ.एस .एन. गौतम दिल्ली, रामनिवाल जी छत्तीसगड ,अनिल कुमार वर्मा जी दिल्ली ,उज्वलजी चौधरी बिहार, उज्वल कोली गुजरात ,आकाश सर्वांजी पंजाब ,सुरेंद्र सिंगजी दिल्ली ,तीलकजी चौधरी मध्यप्रदेश ,विजयरावजी बिहार, हे पदाधिकारी प्रामुख्याने बैठकीला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष विजय पटले यांनी केले.
