दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर.
मा.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील तपशिलाशी आधार जोडण्याकरीता व प्रमाणीकरणासाठी विद्यमान मतदाराकडून आधार संकलनाचा कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमांचा उद्देश मतदाराशी ओळख प्रस्थापित करणे आणी मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणी एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदारसंघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखणे हा आहे. सदर कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरुन आहे.
मतदार याद्यांच्या प्रमाणिकरणासाठी व मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्याचा कार्यक्रम १ ऑगस्टपासून हाती घेतला आहे. त्यांअनूषंगाने देगलूर तालूक्याखत मतदार ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार तालुक्यात सुरु आहे.
निवडणूक विभागाकडून व्होटर हेल्पलाईन ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मतदारांना मतदार ओळखपत्रासोबत आधारकार्ड जोडता येईल. नागरिकांनी ऑनलाईन फॉर्म नंबर ६ (ब) व्होटर हेल्पलाईन या अॅपद्वारे भरावे. अथवा आपले मतदान केंद्रासाठी निवडणूक विभागाद्वारे नियुक्त केलेल्याई मतदान केंद्रस्तारीय अधिकारी ( BLO) यांचेमार्फत आधार प्रमाणीकरण करून घ्याईवे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( BLO) यासाठी घरोघरी भेट देत आहेत. मतदार यादीतील १०० टक्के मतदारांशी संपर्क करुन मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडण्यात येणार आहे. या माध्यमातून तालूक्या१तील मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडावा. असे आवाहन तालूका प्रशासनाने केले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने आधार क्रमांकाच्या सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेतली असल्याने मतदारांनी या सुरक्षेबाबत शंका बाळगू नये, असे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी 90 देगलूर यांनी कळविले आहे.
मतदार स्वंता व्होटर हेल्पलाईन अॅपद्वारे आधार लिंक प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यालची आहे.
1.voter helpline हे app डाऊनलोड करा 2.voter registration ला क्लिक करा 3.फॉर्म 6 b ला क्लिक करा 4.Lets start ला क्लिक करा 5.आपला मोबाईल नंबर टाका 6.आपल्याला otp येईल तो टाका 7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा 8.voter id असेल तर Yes I have voter ID हे निवडा 9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा 10. नंतर proceed क्लिक करा 11.आता तुमचा आधार नंबर टाका 12.Done करा व confirm ला क्लिक करा. तुमचे आधार निवडणूक ओळखपत्राला लिंक झाल्याचा मॅसेज येईल.
करीता देगलूर तालूक्या तील सर्व मतदारांनी आपले ओळखपत्र आधार कार्डाशी आजच लिंक करून घेण्यात यावे असे आवाहन सहा.निवडणूक निर्णय अधिकारी 90 देगलूर यांचेकडून करण्यांत येत आहे.
