दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोक गावडे, माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाडा तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोली तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूर तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भे तालुकाध्यक्ष नियाज शेख, सरिता कांबळे, अजित सावंत, दिलीप सिंह, चंद्रकांत कांबळे, शिवाजी गावडे, राज नायर यांनी आम्हाला पाठींबा देण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी नवी मुंबईतील विकासकामांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शिवसेना उपनेते विजय नहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
