दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका बाखर्डी
राहुल झीबलाजी दुबे(मु नवेगाव, पो बाखर्डी, ता कोरपना जि चंद्रपूर) यांचे निधन झाले असून नवेगावात स्मशान भूमी नसल्याने यांच्या अंतसंस्कारास कुठलीही जागा उपलब्ध नव्हती, शेवटी मौजा वरोडा नवेगाव शिवेतील सतीश भाऊ गोखरे यांनी आपल्या शेतात जागा उपलब्ध करून दिली परुंतु आजू बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी विरोध केल्याने संबधीत विषय स्थानिक कोरपना तहसीलदाराकडे मांडण्यात आला ,शेवटी प्रशाशनाच्या मदतीने मयत वक्तीचा अंतसंस्कार झाला
नवेगावातील स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अशी मागणी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष बबन पेंदोर, राजुरा तालुका अध्यक्ष नेताजी कन्नके ,अमोल निरंजने, नंदू तेलंग, विशाल काटकर, शुभम मून कब्रेश नगराळे प्रशिक काटकर आणि समस्त नवेगाव वासीयांनी केली आहे सदर बाबीकडे प्रशासनाणे विलंब केल्यास पुन्हा या गावात हाच प्रश्न निर्माण होऊ शकतो
समशान भूमी चा प्रश्न सोडविण्यास स्थानिक प्रशासनाणे विलंब केल्यास महाराष्ट्र ट्रायबल आघाडी चंद्रपूर आणि समस्त नवेगाव वासीयांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे
