दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
ठाणे . गेल्या आठवड्यात मनापासून ठाणे पालिका तसेच राजकीय वर्तुळातून डॉ.विपिन शर्मा यांची बदली निश्चित झाली असल्यांची चर्चा सध्या चांगलीच रंगत आहे. ठाणे महापालिका आयुक्त पदावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे राज्य शासनांने नियुक्ती केली असून बदली होताच शुक्रवारी दुपारी अभिजीत बांगर यांनी आपल्या पदाचा पदभार हाती घेतला. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची बदली होणार असल्यांची चर्चा गेली काही महिन्यांपासून सुरु होती तसेच डॉ. विपिन शर्मा यांची बदली मात्र राजकीय वर्तुळातून झाल्यांची चर्चा सध्या सुरु आहे. असे असतानाच गुरुवारी सायंकाळी उशिरा राज्य सरकारने राज्यांतील बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली. त्यांच्या बदलीमुळे रिक्त जागेवर मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे राज्य शासनांने नियुक्ती केली शुक्रवारी दुपारी अभिजीत बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळत पहिल्यांच दिवशी पदभार स्वीकारला असल्यांची माहिती पालिका प्रशासनांने दिली. तसेच अभिजीत बांगर है मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतील अधिकारी असल्यांचेही बोलले जात आहे.
