दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील लंगोट गल्लीसह अन्य तीन विभागांतर्गत दोन तरुणी व तीन मुले बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी नानलपेठ व कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करुन युध्दपातळीवर शोध मोहीम सुरू केली आहे.
शहरातील पोलीस वसाहत आणि लंगोट गल्लीतील अनुक्रमे २१ वर्षीय मुलगी ब्युटी पार्लर घ्या कामाला जाते म्हणून तर २२ वर्षीय तरुणी अचानक घरातून गायब झाली आहे. अशा दोन तरुणी घरातून अचानक गायब झाल्या आहेत. या प्रकरणी नानलपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत शहरातील अजमेर कॉलनी, साखला प्लॉट व एकमिनार मस्जिद या भागांतून वेगवेगळी तीन मुले गायब झाली आहेत. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सर्वत्र शोधमोहीम सुरू केली असली तरी या सर्व गायब मुलांच्या अशा अचानक जाण्याने वातावरण चिंताग्रस्त बनले जाणे स्वाभाविक आहे. अशा प्रकारे मुले गायब होतात का ती केली जातात, का या मागे नेमका कोणाचा हात असावा, यांचाही शोध लावला जाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
