दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे
(दि 10 डिसेंबर 2022 पिंपळे गुरव पुणे )
पुणे ह्यूमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा -2022 घेण्यात आला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कराटेपटू राजेंद्र ज्ञानोबा कांबळे यांना क्रिडा रत्न-2022 पुरस्कार वर्धा जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी इ. झेड. खोब्रागडे, सिनेअभिनेते अनंत जोग, डॉ. बबन जोगदंड, इ मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रम नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, पिंपळे गुरव पुणे येथे पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन कैलास गहिनीनाथ बनसोडे यांनी केले.
