दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी -श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्ह्यातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुकुंज मोझरी,येथे शिक्षणाच्या मूलभूत गरजा यासह विविध सोई सुविधा उपलब्ध आहे.त्यामुळे तिवसा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी मोठया प्रमाणात येथे शिक्षणासाठी येत असतात.मात्र बसच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यां बेहाल होत आहे.सांयकाळी उशीरापर्यंत तासंतास त्यांना बसची प्रतिक्षेत या कडक्याच्या थंडीत बसावे लागत आहे.मोझरी,शिरजगाव,अनकवाडी,मालधूर,धोत्रा आदी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर गावात जाणारी एस.टी. महामंडळाची लालपरी गुरुकुंज मोझरी बस्थानकावर वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री ७:३० ते ८ वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीत स्थानकावर बसची वाट पाहत बसावे लागते.यासंदर्भात अनेकदा तक्रारी देऊन देखील परीवहन महामंडळाला जाग येत नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेकदा बाहेर गावीजावे लागते.शाळेत जाण्यासाठी त्यांना परिवहन महामंडळच्या एस.टी.बस शिवाय,दुसरा कोणताही पर्याय नसतो.गुरुकुंज मोझरी येथील शाळा सायंकाळी ५:३० वाजता सुटते.मात्र, एसटी बस नियोजित वेळेवरत येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना सायंकाळी ७:३० ते ८ वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडीत बस स्थानकावरच बसावे लागत आहे.मुली वेळेत घरी न पोहोचल्यामुळे घरातील पालकही चिंतेत असतात.या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरही मोठा परिणाम दिसून येत आहे.त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.शालेय विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता परिवहन महामंडळाने साडेपाच वाजताच्या दरम्यान बस उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी ग्रामीण ‘भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
