दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
नांदेड:-नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अपंग प्रवर्गातील तसेच पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत असलेल्या बहुतांश शिक्षकांनी बदलीच्या नियमाला छेद देऊन बोगस अपंग प्रमाणपत्र सादर करून बदली संवर्ग-१ चा फायदा घेत असल्याचे आढळून आलेले आहे त्यामुळे खरोखरच मुळात अपंग असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय झालेला दिसून येत आहे नुकतेच 6 डिसेंबर रोजी अॅड.संघरत्न गायकवाड यांनी जि.प.शाळेतील बोगस कारभार , शैक्षणिक , आर्थीक भ्रष्टाचार केल्या प्रकरणी 7 शिक्षकांना फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबीत करणेसाठी आमरण उपोषण केले त्यात समता परिषदेला यश मिळाले आहे. मुळातच अपंग असणारे शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत असलेल्या अपंग प्रवर्गातील शिक्षकांची तसेच पती-पत्नी एकत्रीकरणा अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची पुन्हांदा अ.भा. महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड.संघरत्न गायकवाड यांनी दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड यांना खालील प्रमाणे मुद्द्यांची मागणी केलेली आहे त्यात
नांदेड जिल्ह्यातील अपंग शिक्षक ज्या शाळेत कार्यरत आहेत त्या गावांचे शाळेचे आणि तालुक्याचे नाव तालुका निहाय माहितीची साक्षांकित प्रत द्यावी. नांदेड जिल्ह्यातील बदली संदर्भात अपंग प्रवर्गातून अर्ज भरलेल्या शिक्षकांची नावे शाळा तालुका निहाय यादीची साक्षांकित प्रत द्यावी.जिल्हा परिषद शाळेमध्ये अपंग प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आलेल्या शिक्षकांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्रांची छायांकित प्रत शाळा गाव तालुका निहाय माहितीची साक्षांकित प्रत द्यावी.
जिल्ह्यातील पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची शाळा गाव तालुका निहाय माहितीची साक्षांकित प्रत द्यावी पती-पत्नी एकत्रिकरण अंतर्गत शिक्षकांचे वास्तव्यास असलेले ठिकाण व ज्या ठिकाणी माहिती नियुक्ती मिळाली आहे त्या ठिकाणची शाळा गाव तालुका निहाय माहितीची साक्षांकित प्रत द्यावी
पती-पत्नी एकत्रीकरणाअंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना घर भाडे भत्ता दिला जातो ज्यामध्ये एकाचाच समावेश आहे वा दोघांचाही याबाबत स्पष्ट विवरणासह शिक्षकांची शाळा गाव तालुका निहाय माहितीची साक्षांकित प्रत द्यावी
सदरील मुद्यांची माहिती सविस्तर तपशीलवार मुद्देनिहाय देण्यात आल्यानंतर हजारो शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन निलंबीत होणार आहेत.त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड माहीती उपलब्ध करुन देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन माहीती तात्काळ उपलब्ध करुन न दिल्यास अ. भा. महात्मा फुले समता परिषद विद्यार्थी आघाडी जिल्हा नांदेड तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याचबरोबर मा.न्यायालयामध्ये दाद मागण्यात येईल यास सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद नांदेड प्रशासन राहील याची नोंद घ्यावी असा इशारा अॅड.संघरत्न गायकवाड यांनी १३/१२/२०२२ रोजी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब नांदेड यांना दिला आहे.
