दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी- शिवकुमार बिरादार
क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले यांची १९६ वी जयंती व विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव साजरी करण्यासाठी मुखेडात सर्वसमावेश कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड तर सचिवपदी अदनान पाशा यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती संयोजक राहूल लोहबंदे, रियाज शेख यांनी दिली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने समाज प्रबोधनात्मक व्याख्यान, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम, रक्तदान शिबीर, महिलाअधिकार जनजागृती, विद्रोही कवी संमेलन व शाहीरी जलसा सह सामाजिक उपक्रमाने जयंती महोत्सव साजरी करण्याचा निर्धार समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
राष्ट्रनिर्माते क्रांतीसुर्य ज्योतीराव फुले व विश्वभुषण बोधिसत्व डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य मुखेडात माजी जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, जेष्ठ नेते सदाशिवराव पाटील जाधव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली व सार्वजनिक सर्वसमावेशक या संकल्पनेतुन कार्यकारी मंडळ व सल्लागार मंडळाची निवड करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक दशरथराव लोहबंदे, सदाशिवराव पा.जाधव सह प्रमुख सल्लागार दिलीप कोडगीरे, बापुराव कांबळे, प्रा.उत्तमकुमार कांबळे, अॅड.गोविंद पाटील डुमणे, ज्ञानेश्वर पा.डुमणे, गंगाधर सोंडारे, नागनाथ लोखंडे, पांडुरंग लंगेवाड, वाय.एच.कांबळे, के.एन.कांबळे, डाॅ.राहूल कांबळे, सय्यद अब्दूल, प्रताप चौधरी, दिपक लोहबंदे, अध्यक्षपदी शिवाजी शंकर गेडेवाड, कार्याध्यक्ष शिवराज पाटील जाधव, सचिव अदनान पाशा, सहसचिव शिवानंद बंडे, शंकर चिंतमवाड, उपाध्यक्ष जयप्रकाश कानगुले, प्रविण मारकवाड, सचिन श्रीरामे, विशाल गायकवाड, कोषाध्यक्ष अनिल बनसोडे, योगेश मामीलवाड, सह कोषाध्यक्ष गौस पठाण, बबलु मुल्ला, संघटक अॅड.गजानन देवकत्ते, गिरीधर पा.केरुरकर, सहसंघटक सत्यदिप सोनकांबळे, किरण घोडके, मिरवणूक समिती अध्यक्ष आशितोष कांबळे, सचिव बालाजी संगमवाड, प्रसिद्धीप्रमुख सर्व पत्रकार बांधव यांची निवड करण्यात आली.
