दैनिक चालु वार्ता कोल्हापूर/ चंदगड-संदिप कांबळे
चंदगड( प्रतिनिधी): शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या मधील शिस्तीचा भाग तसेच आपली शाळा टेक्नॉलॉजी असावी या उद्देशातून हे कॅमेरे दिल्याचे श्री आकाश देसाई साहेब यांनी सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असण्याची गरज व्यक्त केली होती. विद्यार्थी हिताच्या दृष्टीकोनातून शालेय परिसरात चार सिसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सीसीटीव्ही असलेली कोदाळी शाळा ही तालुक्यातून पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे.
शाळेच्या परिसर विस्तीर्ण असून विविध उपक्रम राबविले जातात शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनिता वाजंत्री मॅडम व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष दळवी यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा दृष्टीकोनातून ग्रीन हिल रिसॉर्ट चे मालक श्री. आकाश देसाई यांच्याकडे सीसीटिव्हीचे मागणी केली होती त्याला त्यांनी कशाचा हि विलंब नकरता शाळेसाठी चार सीसीटीव्ही संच भेट म्हणून दिली. त्या बद्दल १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री संतोष दळवी यांच्या हस्ते करण्यात आला व त्यांचे आभार मानले.
या शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे लावून इतर शाळांना एक आदर्श निर्माण करुन दिला आहे. यासाठी एकूण १८०००/खर्च आला.
तसेच शाळेला वेळोवेळी मदत करणारे माजी उपसरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री.अंकुश गावडे यांचा हि सत्कार शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.निलेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाजंत्री मॅडम यांनी ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमात शाळेच्या शिक्षिका सौ.सागरिका कुटे मॅडम, शिक्षक श्री.महेश ढोले सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्रीपती कांबळे, भालचंद्र गवस, लक्ष्मण गावडे उपस्थित होते.
