
अजित पवारांचा भर सभेत मिश्किल टोला !
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार नेहमीच वेळ पाळतात. स्वत:च्या चुकांबद्दल ते खुलेपणाने बोलतात. याचा प्रत्यत अनेकदा आला आहे. कालही पुण्यात असच काहीस घडलं आणि ते अजित पवारांनी भरसभेत बोलून दाखवलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पोहचण्याासाठी त्यांना थोडा उशिरा झाला. गाडीतून उतरताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी त्यांच्याकडे पाहून घड्याळ दाखवलं. याच क्षणांवरुन भरसभेत अजित पवारांनी मिश्किलपण टोलेबाजी केली. ज्याची चर्चा सध्या पुणेकरांमध्ये रगंली आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
हा कार्यक्रम ४ वाजता होता पण आम्ही थोडे उशिरा आलो. गाडीतून उतरल्या उतरल्या बावनकुळेसाहेबांनी नुसंत माझ्याकडे पाहून घड्याळ दाखवले. त्यावेळी मी त्यांना म्हटलं काय करता बाबा. आता झालाय उशीर. पण बावनकुळे साहेब मी एकटा कार्यक्रमाला येणार असतो तर राईट टाईमवर आलो असतो. पण प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्रीसाहेब ज्यावेळेस हेलिकॉप्टर चालू होती, त्यावेळेस आम्हाला तिथं बसावं लागते. त्याच्यामुळे आमची पंचाईत होती. नाहीतर मी बरोबर चार वाजता आलो असतो. आता तुम्ही काय ओळखायचं ते ओळखा असा मिश्किल टोला पवारांनी लगावला.