
राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी माझ्यावर काही तरी जबाबदारी द्या.. मला रिकामं ठेऊ नका अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली होती. दरम्यान, पुरग्रस्तांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुंडे यांनी स्वतःहून पूरग्रस्त शेतकऱ्याच्यी मुलीच्या लग्नाची जबाबदारी स्विकारली आहे.
सध्या त्यांनी दाखवलेली तप्तरतेची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
धनंजय मुंडे देखील परळी मतदारसंघात पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासमोर आपली व्यथा मांडताना महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ? असं म्हणतात धनंजय मुंडे यांनी मी तात्काळ तुम्हाला मदत करतो आणि तुमच्या मुलीचे ठरलेल्या वेळेतच लग्न होईल. मी सर्व जबाबदारी घेतो म्हणत राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी पूरग्रस्त पीडित महिला शेतकऱ्याला शब्द देत आधार दिला.
परळी तालुक्यातील तेलसमुख, बोरखेड, ममदापूर आदी गावांमधील अतिवृष्टी नुकसान व पुरपरिस्थितीची मुंडे आज पाहणी करत आहेत. दरम्यान, तेलसमुख येथील एका शेतातील कापसाच्या उभ्या पिकाचे पावसाने नुकसान केले आहे. या शेतकऱ्याच्या मुलीचे दिवाळीत लग्न ठरले आहे. परंतू, या अस्मानी संकटामुळे हे लग्न कसे करावे असा प्रश्न या कुटुंबासमोर होता. धनंजय मुंडेंसमोर या महिला शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली.
यावेळी मुंडे यांनी शेतीच्या नुकसानीसाठी शासन आपली मदत करेल. पण मुलीच्या लग्नाची काळजी करू नका. ठरलेल्या वेळीच लग्न होईल, या लग्नाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी मी घेतो, असे सांगत आधार दिला.