भारताच्या गौरवशाली स्वातंत्र्यलढ्याला आदिवासी स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारकांची दीर्घ परंपरा आहे आणि त्यांचे योगदान अविस्मरणीय राहिलेले आहे. या स्वातंत्र्यलढ्यातील महान वीर आणि योद्ध्यांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष स्थान आहे.१५ नोव्हेंबर १८७५ रोजी उलिहाटू (झारखंड) येथे जन्मलेल्या भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी होत आहे.
भगवान बिरसा मुंडा यांच्या गाथा स्वाभीमानी समाज घडवतील असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले आहे.
दत्तात्रेय होसबाळे पुढे सांगतात की ब्रिटिशांनी आदिवासी समुदायांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचारांमुळे निराश होऊन भगवान बिरसा मुंडा यांचे वडील उलिहाटूहून बांबा येथे गेले. वयाच्या सुमारे १० व्या वर्षी त्यांना चाईबासा मिशनरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. मिशनरी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्याचे, त्यांना त्यांच्या धार्मिक परंपरांपासून दूर करण्याचे कट रचले जात असल्याचे त्यांनी पाहिले. धर्मांतरामुळे केवळ व्यक्तीची धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक जाणीवच दडपली जात नाही तर हळूहळू समाजाची ओळखही नष्ट होते हे त्यांनी ओळखले.l
वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारस्थानांना समजून घेत, त्यांनी सामाजिक प्रबोधनाद्वारे आपली धार्मिक ओळख आणि परंपरा जपण्याचा संघर्ष सुरू केला. वयाच्या २५ व्या वर्षी, भगवान बिरसा यांनी परिस्थितीने गांजलेल्या त्यांच्या समाजात सांस्कृतिक पुनर्जागरणाची लाट आणली. प्रशासकीय सुधारणांच्या नावाखाली ब्रिटिशद्वारे जंगले अधिग्रहण करणे, आदिवासी समुदायांकडून त्यांच्या जमिनीची मालकी हिरावून घेणे आणि सक्तीच्या कामगार धोरणांची अंमलबजावणी करणे याविरुद्ध भगवान बिरसा यांनी एक प्रचंड सार्वजनिक चळवळीचे नेतृत्व केले.
त्यांच्या आंदोलनाचा नारा “अबुआ दिशुम-अबुआ राज” (आपचा देश-आपले शासन) हा तरुणांसाठी प्रेरणामंत्र झाला.
ज्यामुळे हजारो तरुण “स्वधर्म” आणि “अस्मिता” साठी बलिदान देण्याच्यासाठी प्रेरित झाले. आदिवासीचा अधिकार, आस्था, परंपरा आणि स्वधर्माचे संरक्षणासाठी भगवान बिरसा यांनी अनेक आंदोलने आणि सशस्र संघर्ष केला. त्यांच्या पवित्र जीवनाच्या लक्ष्यासाठी संघर्ष करताना ते पकडले गेले आणि २५ व्या वर्षी कारागृहात दुर्भाग्यपूर्ण आणि संशयास्पद स्थिती त्यांचे बलिदान झाले.
समाजाबद्दल त्यांचे प्रेम आणि बलिदानामुळे संपूर्ण आदिवासी समाज त्यांना देव स्वरुप मानून धरती आबा भगवान बिरसा मुंडा म्हणून संबोधून श्रद्धावंत होतो. भारत सरकारने त्यांचा संसद भवनात पुतळा उभारुन त्यांचा उचित सन्मान केला आहे. त्यांचे बलिदान स्वातंत्र्य संघर्षात आदिवासींच्या प्रचंड योगदानाचे उदाहरण बनून संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणास्त्रोत बनले आहे.
धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा, स्वाभिमान आणि आदिवासी समाजाच्या अस्मितेचे रक्षण करण्यासाठी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनातील संदेश आजही प्रासंगिक आहे. वर्तमानकाळात विभाजनकारी विचारधारेच्या लोकांनी भारता संदर्भात आदिवासी समुदाय संदर्भात एक भ्रामक आणि दिशाभूल समज तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अशा वेळी, भगवान बिरसा मुंडा यांच्या धार्मिक आणि धाडसी शौर्याच्या गाथा समाजातील अनेक गैरसमज दूर करण्यासाठी आणि आत्म-जागरूकता, आत्मविश्वास आणि एकता मजबूत करण्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरतील. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वयंसेवकांसह संपूर्ण समाजाला भगवान बिरसा मुंडा यांचे जीवन-कार्य आणि विचार स्वीकारण्याचे आणि “आत्म-जागरूकता” असलेला संघटित आणि स्वाभिमानी समाज निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन करतो असे ही दत्तात्रेय होसबाळे यांनी आपल्या निवदेनात म्हटले आहे.


