इगतपुरी प्रतिनिधी :- विकास पुणेकर
इगतपुरी :- इगतपुरी तालुक्यातील खंबाळे गाव परिसरात एका बिबट्याचे दर्शन झाल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबटे आढळून येत असून खंबाळे गावात देखील आठ दिवसांपुर्वी बिबट्या आलेला आहे. बिबट्याचा वावर गावातील काही नागरिकांना रात्रीच्या वेळी निदर्शनास आल्याने तात्काळ वन विभागाला कळविण्यात आले आहे. ग्रामस्थांना रात्री आवश्यक आल्यासच बाहेर पडण्याची सुचना करण्यात आली आहे. परंतु दिनांक ०४/११/२०२५ रोजी पुन्हा एकदा सायंकाळी पाच वाजे दरम्यान रंगनाथ खंडु घायवट यांच्या घराजवळ आढळुन आला असल्याने त्यांनी गावात कळविले व अनेक ग्रामस्थांनी तिकडे धाव घेतली तसेच प्रत्यक्ष सर्वांनी बघितला आहे. त्यामुळे गावातील वातावरण पुर्णपणे भयभीत झाले आहे. तरी सर्व गावकऱ्यांची मागणी आहे की वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावुन गावात आलेल्या बिबट्यास पकडण्याचा बंदोबस्त करावा.


