4 भावांनी उभारले होते 38 देशांत ‘अरबोंचे’ साम्राज्य…
भारतीय उद्योग विश्वासाठी ४ नोव्हेंबर २०२५ हा दिवस अत्यंत दुःखद ठरला. हिंदुजा समूहाचे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे लंडनमध्ये दुःखद निधन झाले.
विशेष म्हणजे, एकाच वर्षाच्या अंतरात हिंदुजा कुटुंबातील हे दुसरे मोठे एक्झिट आहे; कारण यापूर्वी २०२३ मध्ये गोपीचंद हिंदुजा यांचे मोठे बंधू श्रीचंद हिंदुजा यांचेही निधन झाले होते.
हिंदुचा कंपनीचा १०० वर्षांचा वारसा –
या हिंदुजा औद्योगिक समूहाची पायाभरणी परमानंद दीपचंद हिंदुजा यांनी १९१४ मध्ये मुंबईत केली. त्यांनी ब्रिटिश भारतात इराणसोबत कापड, मेवे आणि चहाचा व्यापार सुरू केला. १९७१ मध्ये परमानंद हिंदुजा यांच्या निधनानंतर, त्यांच्या चार मुलांनी-श्रीचंद, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांनी हा वारसा सांभाळला. या चारही बंधूंनी एकत्र येत ‘हिंदुजा ग्रुप’ला अभूतपूर्व उंचीवर नेले. १९७९ मध्ये समूहाचे मुख्यालय लंडनमध्ये हलवण्यात आले, परंतु त्यांचे कामकाज मुंबई, जिनिव्हा आणि जगभरात सुरूच राहिले.
आज हिंदुजा समूह ऑटोमोटिव्ह, बँकिंग, ऊर्जा आणि मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. यात अशोक लेलँड इंडसइंड बँक आणि गल्फ ऑईल सारख्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्या ३८ देशांमध्ये पसरलेल्या आहेत.
हिंदुजा कुटुंबाची ‘अफाट श्रीमंती’ –
हिंदुजा समूहाच्या श्रीमंतीचा आकडा अनेकांना अचंबित करणारा आहे.या प्रचंड संपत्ती आणि व्यापाराच्या जोरावर हिंदुजा कुटुंब जागतिक औद्योगिक नकाशावर आपले वर्चस्व टिकवून आहे.


