अमेरिकेतून आनंदाची बातमी; डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा थेट म्हणाले…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी भारतासोबतच्या व्यापारी संबंधांवर मोठे भाष्य केले. फक्त भाष्यच नाही तर भारतावरील टॅरिफ कमी करण्याचेही स्पष्ट संकेत दिले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट म्हटले की, भारत माझ्यावर सध्या खुश नाहीये. मात्र, पुन्हा एकदा ते मला प्रेम नक्की देतील. आमचे पुन्हा एकदा संंबंध चांगले होतील आणि प्रेम वाढेल. त्यांनी पुढे म्हटले की, आम्ही भारतासोबत एका व्यापक आणि निष्पक्ष व्यापार कराराच्या अगदी जवळ आहोत. पुढच्या काही दिवसांपासून भारतावर लावलेले उच्च टॅरिफ देखील काढले जाईल. दोन देश अशा एका कराराच्या जवळ आहेत की, तो झाला तर सर्वांना फायदा होईल. भारतावर टॅरिफ लावल्यानंतर पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प हे भारतावरील टॅरिफ रद्द करण्याबद्दल बोलताना दिसले.
टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे चांगले संबंध तणावात आल्याचे बघायला मिळाले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या केलेल्या विधानावरून त्यांनी भारतासोबतच संबंध सुधारण्याची भाषा तर केलीच शिवाय त्यांनी टॅरिफ कमी करण्याचे थेट संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या मुद्द्यावरून संबंध तणावात होती. दोन्ही देशांकडून व्यापाराबाबत चर्चा सुरू असून ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान बोलताना म्हटले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी जवळपास बंदच केली आहे. आम्ही भारतावरील टॅरिफ कमी करणार आहोत. कधीही भारतावरील टॅरिफबद्दल घोषणा होऊ शकते. भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत आणि दक्षिण आशियासाठीचे विशेष दूत सर्जियो गोर यांच्या शपथविधी समारंभात ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले आणि भारताच्या टॅरिफबद्दल भाष्य केले.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला जात असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. आता भारताने रशियाकडू तेल खरेदी जवळपास बंद केल्याने आपण कधीही टॅरिफ रद्द करू शकतो, असे त्यांनी म्हटले. काही महिन्यानंतर भारतावरील टॅरिफ कमी करण्याबद्दल बोलताना डोनाल्ड ट्रम्प दिसले आहेत. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफच्या मुद्द्याहून भारताला सातत्याने धमकावताना दिसले. आता त्यांची भाषा बदलल्याचे बघायला मिळतंय.


