केंद्र सरकारने दिली मान्यता; वाढत्या संख्येबरोबर हल्ले रोखण्यासाठी उपाय !
बिबट्यांना खाद्य म्हणून आता शेतात अन बिबट प्रवण परिसरात शेळ्या सोडण्यात येणार आहे.त्यामुळे मानवा वरील हल्ले कमी होण्यास मदत होईल.तसेच बिबट्याच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
पुणे शहरातील वनविभागाच्या मुख्यालयात त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.या बैठकीत पुणे,अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील वाढत्या बिबट्यांच्या हल्यांबाबत आढावा घेत कृती आराखडाही दिला.
वनमंत्री नाईक यांनी सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत पुण्यातील वनविभागाच्या मुख्यालयात बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या हल्ल्यांबाबत आढवा बैठक घेतली.यात पुणे,अहिल्यानगर आणि नाशिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यात त्यांनी अधिकाऱ्यांना बिबट्यांच्या हल्यात जीवीत हानी रोखण्यासाठी काय करावे यासाठी कृती आराखडा दिला.बिबट प्रवण क्षेत्रात आता शेळ्या सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.ज्यामुळे मानवी वस्तीवरील हल्ले कमी होतील.बिबट नसबंदीला केंद्राची मान्यता मिळाली असून शिकारीचा निर्णय विचाराधीन आहे.मात्र जेथे बिबट नियंत्रणातच येत नसेल तेथे त्याला तेथेच गोळ्या घालण्याचे आदेश आहे.या बाबी वनमंत्र्यांनी या वेळी पत्रकारांशी बोलताना सांगीतल्या.
काय म्हणाले वनमंत्री…
-बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असून बिबट्यांना पकडण्यासाठी एआय तंत्रज्ञाचा वापर करणार.
-वनतारात स्थलांतर करणार त्याचा निर्णय केंद्राकडून लवकरच येणार.
-मानवी वस्त्यांवरील हल्ले कमी होण्यासाठी शेतात आता शेळ्या सोडणार.
– चंद्रपूरच्या धर्तीवरच पुणे,नाशिक,अहिल्यानगर एआय यंत्रणा कार्यांन्वीत करणार
-या पुढे जीवीत होनी होवू देणार नाही.पुणे जिल्ह्यासाठी ११ कोटी रुपये मंजुर केले
– नाशिक ला कुंभमेळा होणार आहे.त्या पार्श्वभूमीवर तेथे तातडीने यंत्रणा उभारणार
– मनुष्यहानी झाली तर २५ लाख द्यावे लागतात.त्याऐवजी शेळ्या खेरदी करणे सोपे.
-आपण आफ्रीकेतून चित्ते,सिंह आणतोय.तिकडे बिबटे नाहीत.इकडून त्या देशात बिबटे पाठवण्याची परवानगी मागणार.


