कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
जिल्हास्तरीय गोल्ला- गोल्लेवार यादव समाज सेवा संघटना जिल्हा नांदेड च्या वतीने. दि. २४ जानेवारी रोजी नांदेड येथे, संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील गोल्ला-गोल्लेवार यादव समाज बांधवांच्या, भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात समाज हित संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला समाज बांधवानी हजारो च्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी केले आहे. होणाऱ्या मेळाव्यात वधु वर परिचय मेळावा, सुशिक्षित बेरोजगार मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम, समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळा, सेवानिवृत्त कर्मचारी, पदोन्नत कर्मचारी, व नवनियुक्त कर्मचारी यांचा सन्मान सोहळा, प्रगतशील शेतकरी, यशस्वी उद्योजक, व पि एच डी/नेट सेट धारक यांचा सत्कार सोहळा यासह अन्य विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा २४ जानेवारी रोजी, आर्य वैश्य मंगल कार्यालय, लातूर फाटा जवळ, नांदेड येथे होणार आहे.या मेळाव्यासाठी कंधार तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, गोल्ला-गोलेवार समाजाचे नेते माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी केले आहे.
