दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मंनधरणे
देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ताण, तणाव निवारण व मानसिक आरोग्य तपासणी व मोफत औषध,
गोळ्या वाटप शिबिर दि.१७ फेब्रुवारी २०२६ मंगळवारी रोजी सकाळी १० ते १ वाजेच्या दरम्यान आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा देगलूर तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहान सर्व वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालय, देगलूरच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
श्री. गुरूगोविंद सिंघजी रूग्णालय यांच्या वतीने ग्रामीण भागातील जनतेसाठी ताण, तणाव निवारण व मानसिक तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये
मानसिक रोग, डिप्रेशन / टेन्शन, बेचैनी, जुनाट डोकेदुखी, व्यसन समस्या, झोपेच आजार, फिट/मिरगी, आकडी, लैगिक समस्या वयोवृध्द लोकांमध्ये असलेले विसराळूपणा, भानामती, करणी इत्यादी आजारावर मोफत औषधोपचार व समुपदेशन करण्यात येणार आहे. मानसिक ताण-तणाव यावर तालुक्यातील सर्व रुग्णांनी तपासणी केलेला रिपोर्ट सोबत घेऊन यावे त्यांचा योग्य उपचार करण्यात येणार आहेत.
देगलूर तालुक्यातील सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे डॉ. संजय पेरके जिल्हा शल्यचिकित्सक समान्य रुग्णालय, नांदेड डॉ. नरेश देवणीकर वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, देगलूर डॉ. संगीता देशमुख , जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड,डॉ. शाहु शिराढोणकर मानसोपचार तज्ञ व आरोग्य समितीच्या सदस्यांनी आव्हान केले आहे.
