प्रतिनिधी / स्वाती हडकर
ग्रामीण, कृषी व सहकार साहित्य संमेलनामध्ये उद्या दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत दै. सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.
या विशेष मुलाखतीत ग्रामीण विकास, कृषी क्षेत्रातील आव्हाने, सहकार चळवळीचे भविष्य तसेच साहित्य आणि समाज यांच्यातील नाते यावर सखोल चर्चा होणार आहे. शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून उपस्थित राहून दिवसभर आयोजित विविध परिसंवादांमधील ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन व विचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
