दैनिक चालू वार्ता. पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: केशव पाळवदे.
पिंपरी, दि. ४ एप्रिल २०२६ – पिंपरी-चिंचवड शहरातील अजमेरा परिसरात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , फिर्यादी, जितेंद्र गणपत रसाळ (वय३८ , व्यवसाय – मेडिकल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सुरज मदन पाटील (रा.काटी, ता. इंदापूर, जि. पुणे) याने ओळखीचा फायदा घेत नोकरी लावणयाचे आमिष दाखवले.
आरोपीने फिर्यादीला समाजकल्याण विभागात वरिष्ठ
निरीक्षक पदावर नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच फिर्यादीचा पुतण्या सत्यम दत्तात्रय रसाळ आणि विक्की राजाराम रेणुसे यांना नागपूर कारागृह पोलिस विभागात नोकरी मिळवून देण्याचे सांगितले.
नोकरी न लावता आरोपीने रक्कम उपहार करून
फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
हा प्रकार सप्टेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान अजमेरा येथील योगी को-ऑपरेटिव्ह सोसायटी परिसरात घडला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३
च्या कलम ३१६ (२) व ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करणयात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.
