
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-निरज तांडेल
सातारा : सातारा जिल्ह्यातील तालूका वाढे २०-२१ या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सूचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवणं या योजनेंतर्गत १ कोटी ५ लाखाच्या मिळालेल्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. हे वाढे गावानं दाखवून दिलं असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामं झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरून व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा. सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा आहे. या जिल्ह्यानं अनेक शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवले आहेत. गेल्या दोन वर्षापासून सर्वजण कोरोना संकटातून गेलो आहोत. या संकटाच्या काळात अनेकांनी चांगलं काम केलं. कोरोना संसर्गामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. रोजगाराच्या संधी वाढवण्यावर शासनानं भर दिला आहे. शासनानं महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजारपर्यंत लाभ देण्यात येणार, हे सन २०२२ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलं आहे. याचाही नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळेल. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उत्तम दर्जाचं बियाणं, खत व कृषी विभागामार्फत मार्गदर्शन केलं जात आहे. सातारा येथील सैनिक स्कूलच्या सोयी-सुविधांसाठी ३०० कोटींची तरतूद तसंच जावली तालुक्यात जल पर्यटन प्रकल्पासाठी ५० कोटी व महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खंडाळा तालुक्यातील नायगांव येथील सावित्रीबाई फुले विद्यालय, नायगांव, या गावांतील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्याच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून यापुढे विकास प्रक्रिया अधिक गतीनं राबवण्यात येईल.