
दैनिक चालू वार्ता नांदेड-प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड– कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस ( बु.) या गावी श्री सोमेश्वर महादेव मंदिर स्थापना व कलशारोहण सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने थाटामाटात संपन्न झाला या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या आनंदाने व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता या सोहळ्याचे आयोजन व नियोजन सर्व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते.
हा भव्यदिव्य लिंग स्थापनेचा व कलशारोशणाचा कार्यक्रम श्री गुरुमाऊली परमपूज्य वसुंधरा रत्नश्री ष ब्र.प. 108 सद्गुरु राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री ष.ब्र.प 108 डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड , ष.ब्र.प.108 डॉक्टर सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरा , श्री राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज आमदपुरकर , श्री म.नि.प.संगण बसव महास्वामीजी विरक्त माठ निलंगा या प्रमुख गुरुवर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. श्री सोमेश्वर महादेव मंदिर लिंग स्थापना व कलशारोहण सोहळ्यात होमहवन , अभिषेक , आदीविधि तसेच श्री शि.भ.प. मन्मथ आप्पा डांगे गुरुजी उस्मानगर यांच्याशी कीर्तनाचे व रात्रीच्या वेळी शिवजागराचे आयोजन करण्यात आले होते.
सोमेश्वर महादेव मंदिर लिंग स्थापना व कशा रोहण कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिग्रस नगरीचे माली पाटील तथा विद्यमान उपसरपंच माननीय शंकरराव धोंडीबा पाटील तसेच सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैजनाथ मधुकरराव चिद्रवार पोलीस पाटील प्रतिनिधी नागेश गंगाधर जोगपेटे माजी तंटामुक्ती अध्यक्ष पंडित शंकरराव भुरे , दत्ता गुजरे , रामदास खंदारे इत्यादी मान्यवरांसह सर्व गावकऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला या कार्यक्रमात गावातील लग्न होऊन गेलेल्या सर्व बाई लेकींना साडी-चोळी चा आहेर देण्यात आला व दिग्रस गावासह पंचक्रोशीतील जनतेसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा स्वरूपाचा झाला.