
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
पुणे जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा आध्यक्ष प्रदीपदादा गारडकर यांचे नीरा नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थानला दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आले आसता पिंपरी बुद्रुक येथील माजी सरपंच श्रीकांत बोडके यांच्या वाढदिवसा निमित्त सदिच्छा भेट दिली. यावेळी श्रीकांत बोडके यांचा वाढदिवस.शाल श्रीफळ व हार फेटा बांधून अध्यक्ष प्रदीप गारडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी यावेळी सरपंच श्रीकांत बोडके यांना शुभेच्छा दिल्या. श्रीकांत बोडके यांच्या वाढदिवसा निमित्त जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर बोलत आसताना म्हणाले की आशा आनेक निवडणुका येतील, जातिल पण सोसायटीचा पराजय झाला म्हणून खचून जाऊ नका आम्ही तुमच्या आडचणीला पाठीशी खंबीरपणे उभे राहू. पुणे जिल्हा बँक आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायत आपल्या कडे आहे. हे लक्षात ठेवून उमेदीने कामे करा. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सर्व आपल्या पाठीशी आसल्यामुळे ऊस तोडणीसाठी कोणत्याच अडचणी येऊ देणार नाही. वरिष्ठ पातळीवर हा ऊस तोडणीचा प्रश्न मार्गी लावू या पंचक्रोशीतील सर्वच राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहू. जिल्हा आध्यक्ष प्रदीपदादा गारडकर यांचे यावेळी उद्गार,, सरपंच श्रीकांत बोडके ऊस तोडणीच्या मुद्द्याबद्दल बोलत आसताना म्हणाले की ऊस तोडणीच्या मुद्द्यावर राजकारण आल्याने मतदार सभासद यांना दडपण निर्माण केले त्यामुळे नाईलाजाने मतदान राज्याला सामोरे जावे लागल्याने म्हणूनच आम्हचा पराजय झाला. प्रत्येक निवडणूक आली की उसाचा प्रश्न आमच्या समोर असतो याचा कुठेतरी विचार करून प्रश्न मार्गी लावावा श्रीकांत बोडके यांचे वाढदिवसा निमित्त उदगार ,, प्रमुख उपस्थिती जिल्हा अध्यक्ष प्रदीपदादा गारडकर, सरपंच पांडुरंग डिसले, उपसरपंच दादासाहेब शिरसागर, विद्यासागर वाघमोडे, भगवान कोकाटे, भैय्यासाहेब कोकाटे, सरपंच श्रीकांत बोडके यांच्यासह पिंपरी पंचक्रोशीतील आनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आजी-माजी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.