
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
जालना जिल्ह्यांमध्ये सध्या पोलीस अधीक्षकांच्या पदासाठी संगीत खुर्ची सारखा खेळ चांगलाच रंगला असल्यांचे दिसून येत आहे. दीड महिन्यांत जालनाकरांनी आत्तापर्यंत ४ एसपी पाहिले सध्या पोलीस अधीक्षक पदाचा प्रभारी पदभार आर. रागासुधा यांच्याकडे सुपूर्द केला असून . दीड महिन्यांपासून जालना जिल्ह्यांला कायमस्वरुपी पोलीस अधीक्षक मिळत नसल्यांमुळे संगीत खुर्चीचा खेळ चांगलाच रंगला आहे या संगीत खुर्चीचा खेळ मात्र सर्वसामान्य जनतेला आता वैताग आलेला दिसून येत आहे. तर लोकप्रतिनिधी मात्र सोयीच्या अधिकाऱ्यांसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करताना दिसून येत आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या बदलीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्याकडे दहा दिवस, तर अमरावतीचे एसआरपीचे समादेशक हर्षद पोद्दार यांच्याकडे जवळपास १७ दिवस प्रभारी पदभार होता. राज्यांच्या पोलिस महासंचालकांनी पुन्हा रविवारी तिसऱ्यांदा पोद्दार यांना पुढील पोलीस अधीक्षक येईपर्यंत म्हणजे पुढील आदेशापर्यंत म्हणजे नवीन पोलिस अधीक्षकांच्या नियुक्ती पर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदत वाढ घेवुन दोन दिवसांचा कालावधीही उलटला नाही तोच प्रभारी पोलिस अधीक्षक हर्षद पोद्दार अमरावतीला रवाना झाले. दिनांक ४/६/२०२२ वार शनिवारी सकाळी जालना येथील राज्य राखीव समादेशक आर. रागासुधा यांच्याकडे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाचा पदभार सोपवला आहे. श्रीमती आर .रागासुधा यांनी यापूर्वी परभणीच्या अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे असून त्या २०१६ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत श्रीमती आर. रागासुधा या किती दिवस पोलीस अधीक्षक म्हणून जालना जिल्ह्यांचे काम पाहतील याकडे आता चांगलेच लक्ष लागून राहिले आहे का नवीन पोलीस अधीक्षक पदाचा तिढा सुटेपर्यंत काम पाहतील का ? असा प्रश्न आता जालनाकरांनी केला आहे.