दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी- पंकज रामटेके
आधिवासी अस्मिता स्वायत्तता आणि संस्कृतीला वाचवण्यासाठी तत्कालीन ब्रिटीश व्यवस्थेविरुद्ध लढा उभारून जंगल व जमिनीसाठी लढा देणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त मौजा नकोडा गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नकोडा गावातील भगवान बिरसा मुंडा देवस्थानात त्यांचा प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी देवस्थान परिसराच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद निधी मधून ४ लक्ष निधी मंजूर करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी कार्यक्रमास उपस्थित सरपंच किरण बांदुरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.प सदस्य रजत तुरानकर, भाजपा शहर अध्यक्ष बाळकृष्ण झाडे,दिलीप कोवे,पंढरी कोवे,विकास मेश्राम, पराग पेंन्दोर,बबन मडावी, शंकर पेंन्दोर,विक्की कोवे,अनिकेत गेडाम,मनोज गेडाम,राजु तिरानकर,दिलीप मेश्राम, सुरज गेडाम,शंकर गेडाम,जनार्धन गेडाम,व गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते.
