
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
वनविभागाला जमीन संपादित करण्यात यश…
गेल्या पस्तीस वर्षांपासून वन विभागाच्या वन जमिनीवर अतिक्रमण करून बस्तान मांडून बसलेल्या अतिक्रमणधारकावर अखेर वन विभागाने पोलिस फौजफाट्यासह दिनांक ११ जून २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास वनकर्मचारी व पोलीस अशा २०० कर्मचाऱ्यांना तैनात करून अतिक्रमण जमिनीवर पाच जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्याची धडाकेबाज कार्यवाही करण्यास सुरुवात केल्याने अनेक अतिक्रमण धारकाचे चांगलेच धाबे दणाणले आहे…
सहस्रकुंड पर्यटन स्थळ असलेल्या वन विभागाच्या ४० एकर वन जमिनीवर अतिक्रमण धारकाच्या ताब्यातून वनविभागाला जमीन संपादित करण्यात यश आले आहे… यामधील अनेक राजकीय पुढाऱ्यांनी व्यापाऱ्यांनी वनजमिनीवरील प्लॉट ग्रामपंचायतीला नमुना क्रमांक आठ ला लावले व वन जमिनीचा भूखंड श्रीखंडा सारखा वाटून खाल्ला त्यावर सुद्धा वन विभागाचे बुलडोजर चालवले असल्याने अनेक नेत्यांनी मांडवली करण्याचा प्रयत्न केला असल्याचे विदारक चित्र शेवट क्षणी पहावयास मिळाले आहे वन विभागाने ही कारवाई करण्यास यश मिळविले असले तरी काही कुंटूबाना बेघर होताना पहावयास मिळाले…
सदरील ही चाळीस एकर वनजमीन ही सहस्रकुंड निसर्ग पर्यटन स्थळाच्या मुख्य रस्त्याला लागून असल्याने या जमिनीची आजच्या किमतीत करोडो रुपयाची किंमत झाल्याने या जमिनीकडे अनेक पुढारी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले होते त्यातच ही वन जमीन गिळकृत करण्याचा प्रयत्न पुढाऱ्यांनी चालवला होता.
सदरील वनजमिनीवरील अतिक्रमण निघाल्याने येथे निसर्ग रम्य नर्सरी उभारल्या जाऊन येथे एक टुरिझम पॉइंट निर्माण होऊ शकतो. या कारवाईचा पुढाकार घेवून इस्लापूर येथील वनाधिकारी प्रकाश शिंदे यांनी ही कारवाई केल्याने शासनाची कोट्यावधींची मालमत्ता ही वनविभागाकडे संपादीत झाली.
या कारवाई दरम्यान बोधडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव, अप्पारापेठचे वन अधिकारी ऋषीकेश चव्हाण, फिरत्या पथकाचे वन अधिकारी माधव केंद्रे, हिमायतनगरचे वन अधिकारी बालाजी चव्हाण, नुतून वन अधिकारी धनगे यांनी हिरारीने पुढाकार घेतला होता. सदरील कारवाई प्रसंगी किनवट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे यांनी भेट देऊन येथील कारवाई संदर्भात कायदा सुव्यवस्था अबाधित आहे किंवा नाही याचा आढावा घेतला तर किनवट येथील नायब तहसीलदार मोहम्मद रफीक मोहम्मद बशीरोदीन यांनी देखील सदरील परिस्थीतीची पाहणी केली व सहाय्यक उपवनसंरक्षक लखमावाड यांनी उशीरा का?होईना भेट देऊन वन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यवाहीत हिमायतनगर, बोधडी, इस्लापुर, अप्पारापेठ, येथिल वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी व महसूल विभागाकडून केशव थंळगे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते, इस्लापूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेवाळे, पोलिस उपनिरीक्षक भारत सावंत, योगेश बोधगिरे त्याच्या कर्मचाऱ्यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.