
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
चांगेफळ : दि.१७.बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागातील चांगेफळ गावातील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्र व स्टेट बँक ऑफ इंडियाकडे प्रत्येकी ५.५० कोटीच कर्ज मागितल्याची बातमी समोर आली आहे.या कर्जासाठीचा अर्ज या शेतकऱ्याने बँकेकडे दिला आहे मात्र या अर्जामुळे बँक अधिकारीही चक्रावून गेले आहेत.
शुभम इंगळे असं या तरुण शेतकऱ्याचं नावं असून त्यांने म्हटलं आहे की, ‘मी अल्पभूधारक शेतकरी असून मला शेतीतून काहीही प्रगती करता आली नाही , मी अनेक व्यवसाय करून बघितले पण मला त्यात यश आलं नाही. त्यामुळे मला पंचतारांकित हॉटेल बांधायचं आहे. सध्या देशात निवडणुकीच वातावरण असलं की पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय जोमात असतो.
दोन मुलींची लग्न, डोक्यावर बचत गटाचे कर्ज, आर्थिक विवंचनेतून शेतमजुराने उचललं टोकाचं पाऊल
निवडणूक आली की राजकीय पक्ष हे माझ्या भागातील ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांना माझ्या हॉटेलमध्ये आश्रयास ठेवतील व त्यातून मला उत्पन्न मिळाले की मी बँकेच कर्ज परतफेड करेल. असं त्यांनी सांगितलं आहे. जरी या तरुण शेतकऱ्याने अशक्य अस कर्ज मागितलं असेल तरी यातून मात्र आपल्या व्यवस्थेचं अपयश नक्कीच दिसून येत आहे.
राज्यसभा असो की सत्ता स्थापन करतानाची राजकीय पक्षांची कसरतीमध्ये लोकप्रतिनिधींची दिवाळी असते, हे आपणाला महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेच्या ट्रायडंटमधील घटनाक्रमावरुन लक्षात येतेच. अशातच आता राज्यसभेच्या निवडणुकांवेळी हॉटेलमध्ये डांबून ठेवलेले आमदार असो की आता विधान परिषदेसाठी आमदारांना दिलेला आदेश असो यामुळे आमदारांची दिवाळी असून पंचतारांकीत हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम करायला भेटतो.
त्यामुळे साहजिकचं एकीकडे कर्जामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या करत असताना सत्ताधारी आणि विरोधक अशी पैशांची उधळपट्टी करत आहेत. त्यामुळे त्या युवकाने बँकेकडे केलेल्या मागणीपेक्षा मांडलेल्या व्यथा महत्वाच्या असल्याचं यातून समोर येत आहे.