
दैनिक चालू वार्ता कोल्हापूर प्रतिनिधी -शहाबाज मुजावर,
पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा व सुरभि सांस्कृतिक एवं सामाजिक युवा संघटन, आपटी यांच्यावतीने आपटी येथील लोकसंस्कृती आणि इतिहास अभ्यासक प्रा. आनंद गिरी यांच्या ऐतिहासिक लेखांचे पुस्तक प्रकाशन सोहळा प्रा.डॉ. राजेंद्र पोंदे याच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
प्रा. आनंद गिरी हे महाराष्ट्रातील लोकसंस्कृती व लोककलावंत यांच्या संशोधन क्षेत्रातील सुपरिचीत असे नाव आहे. १९८५ ते २०१६ या काळात प्रसिध्द झालेल्या वर्तमानपत्रातील ऐतिहासिक चरित्रात्मक लेखांचे संकलन पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळ्याच्या वतीने शिवप्रसाद शेवाळे यांनी संपादित करुन प्रा. गिरी यांच्या गौरवार्थ ‘प्रा. आनंद गिरी यांचे ऐतिहासिक लेख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून महादजी शिंदे यांच्यापर्यंत मराठेशाहीच्या शूरवीरांचे चरित्राचे पैलू मांडले आहेत. हे पुस्तक प्रकाशन प्रसिद्ध साहित्यिक दि. बा. पाटील, प्रा. डॉ. आबासाहेब शिंदे, शाहीर शहाजी माळी, प्रा. आप्पासाहेब खोत यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा. आनंद गिरी यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच शाहीर रंगराव पाटील आणि सहकाऱ्यांनी शाहिरी सादर केली. यावेळी विश्वासराव पाटील, आशीष पाटील, स्वप्नील पाटील, युवराज सूर्यवंशी, रणजित शिपुगडे, संतोष कांदेकर, विजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.