
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा – नांदेड जिल्ह्यात लवकरच जिल्हा कार्यकारिणी तालुका व सर्कल नुसार धर्मवीर शेतकरी संघटनेची मोर्चेबांधणी चालु असुन लवकर बैठक घेऊन कार्यकारिणी व नियुक्त्या जाहिर करणार असल्याची माहिती धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव यांनी दिली
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर , मराठा आरक्षणावर , बॅकेतील प्रश्न , अन्याय अत्याचार यावर सतत प्रश्न उठवणारी व सडेतोड उत्तर देणारी प्रा बाळासाहेब जाधव यांची धर्मवीर शेतकरी संघटनेना पुन्हा एकदा नव्याने तालुक्यासह जिल्हाभरात सक्रिय होणार असल्याची चिन्हे दिसुन येत आहेत.
80% समाजकारण व 20% राजकारण करणारी धर्मवीर शेतकरी संघटना तालुक्यासह जिल्हाभरात नावलौकिक आहे या संघटनेत येणाऱ्या काळात समाजकारणाची आवड असणाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा बाळासाहेब जाधव यांनी दिली आहे.