
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
आमदार सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत तिरंगा दाखवून सुरुवात
—————————————
महालगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे न्यू हायस्कूलच्या वतीने”हर घर तिरंगा” या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “हर घर तिरंगा ” ही मोहीम राबविण्यात येत असून न्यू हायस्कूलमध्ये मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे,बापु शेळके,राजु गलांडे, मुख्याध्यापक एस.एम. जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा उंचावून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर उत्साहात साजरा केला जात आहे. १३ ते१५ ऑगस्ट दरम्यान “हर घर तिरंगा” ही मोहीम राबविण्यात राबवली जाणार आहे. या मोहिमेची पुर्णतः अंमलबजावणी व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर न्यू हायस्कूलमध्ये प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. हर घर तिरंगा ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी प्रभात फेरी दरम्यान या मोहिमेत सहभागी कसे व्हायचे, झेंडा कुठे मिळणार, तो कसा उभारावा, झेंड्याची काळजी कशी घ्यावी यासह १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान गावातील प्रत्येक घरावर ध्वजसंहितेचे पालन करून तिरंगा लावण्याचे आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आले. तसेच प्रभात फेरी दरम्यान हर घर तिरंगा यासह देशभक्तीपर घोषणा देत आणि विविध पोस्टच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
मुख्याध्यापक एस.एम.जगताप,
प्रा.आर.बी.घोलप,आर.आर.सुरासे,श्रीमती माधुरी पवार आर.पी.कवडे,आर.बी.बनसोडे,
एन.बी.शेळके,एस.डी.दसपुते
,एस.पी.शेळके,एन.एस.डगळे,
आर.जी.राठोड,के.सी.वाळेकर,
डि.आर.अहिरे,एस.डी.काकडे,
जे.जे.गिरी, श्रीमती यु.बी.भामरे,
एस.पी.चव्हाण,ए.एम.गायकवाड,
ए.एस.पठाण,जे.एच.गायके यासह अनेकांची ऊपस्थिती होती.