
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
नांदगाव:- नांदगाव, चिंचोली येथे लोहा,कंधार मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आमदार माननीय श्री. श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणच्या शेतकऱ्यांची भेट घेऊन
अतिवृष्टी,पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतीच्या नुकसानीच्या संदर्भात शेतकऱ्यांशी सुसंवाद साधून झालेल्या नुकसानी बद्दल विचारपूस करून सर्व शेतकऱ्यांना धीर दिला व शासन स्तरावर शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानी संदर्भात योग्य अशी नुकसान भरपाई हे झालेल्या पिकांच्या संदर्भात मिळाले पाहिजे. या संदर्भात शासन स्तरावर मी स्वतः पूर्ण प्रयत्नशील आहे. असे यावेळी शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना सांगितले. व या नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व शेतकऱ्यांनी या संकटाशी खंबीरपणाने तोंड द्यावं. पूर्ण पणाने “शासन आणि मी स्वतः”सोबत आहोत.काळजी करू नका असे सर्व शेतकऱ्यांना यावेळी सांगून शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी श्री.व्यंकटेश मुंडे साहेब तहसीलदार लोहा, भास्करराव पाटील जोमेगावकर, गोविंदराव पाटील सरपंच चिंचोलीकर, उद्धवराव नांदगावकर, अनिकेत पाटील जोमेगावकर, प्रल्हाद भरकडे, मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पत्रकार सर्व गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.